सातारा: माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित | पुढारी

सातारा: माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित

सातारा पुढारी वृत्तसेवा: अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीच्या अनुषंगाने अनाधिकृत वाळु वाहतूक करणारे वाहन पकडून सोडून दिले असल्याची ऑडीओ व व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्याप्रकरणी माण तालुक्यातील वाकीचे तलाठी एस. एल. ढोले, खडकीचे तलाठी एस. व्ही. बडदे, मार्डीचे तलाठी वाय. बी. अभंग, वरकुटे-म्हसवडचे तलाठी जी. एस. म्हेत्रे, जांभुळणीचे तलाठी बी. एस. वाळके यांना शुक्रवारी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शासकीय सेवेतील तलाठी या पदावरून निलंबित केले असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माण तालुक्यातील अवैध वाळु तस्करी ही प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यामुळे चांगलीच फोफावली आहे. अगदी माणगंगेत विस-पंचविस फुटा पर्यंत खड्डे पडले असुन खालुन वर पंर्यत सर्व अधिकारी मलिदा मिळत असल्याने ’तेरी भी चूप और मेरी भी चुप ’ च्या भुमिकेत असतात काही दिवसा पुर्वी वाकी ता.माण येथे अनाधिकृत वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून सोडून दिले असलेची ऑडीओ व व्हीडीओ क्लीप व्हायरल झाली आहे.

त्यानुसार संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून दिले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांत एस.एल.ढोले , एस.व्ही.बडदे, वाय.बी.अभंग,जी.एस.म्हेत्रे,बी.एस.वाळके या पाच तलाठ्यांवर प्राथमिक कर्तव्ये व जबाबदारी पार पाडण्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबित केले आहे.

सबंधित तलाठी यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 10 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत माण तहसिलदार यांनी प्रस्ताव माण-खटावचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केला होता.

मुंबई : महानगरपालिकेच्या ‘लिपिका’ने कमावली 47% जादा मालमत्ता

त्यामध्ये तहसीलदार माण यांनी अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखणेकामी नेमूण दिलेल्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा ,मंडल अधिकारी म्हसवड श्री. के.पी. शेंडे पथक प्रमुख यांचे समवेत या कार्यालयास चुकीचा अहवाल सादर करुन प्रशासनाची दिशाभूल करणे,गौण खनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे,गौण खनिजाची अवैध व वाहतूक करणा-या इसमांशी तडजोड करत असलेचे व्हिडोओ रेकॉडीग वरुन दिसून येत आहे.

जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) (8) नुसार वाहन जप्तीचे अधिकार असतांना सदर नियमांस बाधा निर्माण करणे,गौण खनिज सारख्या महसूल मिळवून देणा-या व पर्यावरणाचा समतोल साधणा-या संवेदनशील प्रकरणात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांची एक वेतनवाढ कायम स्वरुपी रोखणे,पदास नेमून दिलेल्या कामामध्ये त्यांनी जाणीव पुर्वक हलगर्जीपणा करणे असे दोषारोपपत्र उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केले आहे.

त्यावरून माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा नियम 3 चा भंग केला आहे. शासकीय कर्मचारी या नात्याने त्यांनी शासकीय सेवा करताना सचोटी कर्तव्यतत्परता व शासकीय कर्मचार्‍यांला न शोभेल असे वर्तन करून त्यांना कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 चा नियम 4 (1) (अ) शासकीय सेवेतील तलाठी या पदावरून निलंबित केले आहे.

निलंबन कालावधीत सबंधित तलाठी यांचे मुख्यालय हे तहसिल कार्यालय खटाव राहणार आहे. या कारवाईमुळे जनतेतून स्वागत होत असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून यामध्ये सामील असणार्‍या बड्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button