कोल्हापूर : शासनाचे बंद कान उघडण्यासाठी ‘विनाअनुदानितां’चे घंटानाद आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : शासनाचे बंद कान उघडण्यासाठी ‘विनाअनुदानितां’चे घंटानाद आंदोलन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने बंद केलेले कान उघडावे, यासाठी ‘विनाअनुदानित’ शिक्षकांनी शनिवारी घंटानाद आंदोलन केले. प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा निधीसह घोषित कराव्यात व अघोषित शाळा निधीसह घोषित करण्यात याव्यात, या मागणीसाठी तीन दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

आजपर्यंत शासनाने केवळ वेळकाढूपणा केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कोणाला वेळ नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आणखी किती आंदोलने करायची, निम्मे आयुष्य आंदोलन करण्यात गेले. आता तरी शासनाने बंद कान उघडावे. विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, दत्तात्रय कदम, प्रकाश पाटील, गजानन काटकर, शिवाजी खापणे, भानुदास गाडे, राजेंद्र भोरे, सावता माळी, राजू सुतार, जयश्री पाटील, स्नेहा भुसारी आदी सहभागी झाले होते.

Back to top button