सातारा: सुहास राजेशिर्के आऊट ऑफ कव्हरेज; सातार्‍यात उलटसुलट चर्चा | पुढारी

सातारा: सुहास राजेशिर्के आऊट ऑफ कव्हरेज; सातार्‍यात उलटसुलट चर्चा

सातारा पुढारी वृत्तसेवा: सातार्‍याचे माजी उपनगराध्यक्ष व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुहास राजेशिर्के त्यांच्या वाढदिवसा दिवशीच आऊट ऑफ कव्हरेज राहिल्याने सातार्‍यात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सुहास राजेशिर्के यांनी उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून आपली कारर्किद गाजवली होती. प्रभाग क्र. 20 मध्ये विकासकामे खेचून आणणारे नगरसेवक ही राजेशिर्के यांची ख्याती आहे. कोरोनाच्या कालावधीत ग्राऊंडवर राहून राजेशिर्के यांनी लोकसेवा केली.

दरवर्षी त्यांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र, शनिवारी वाढदिवस असतानाही सुहास राजेशिर्के मात्र आऊट ऑफ कव्हरेज होते. पेठेतील नागरिकांसह सातारकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा राजेशिर्के मात्र गायब होते. फोनवरुन शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज लागत होता.

दरवर्षी वाढदिवसा दिवशी सातार्‍यात असणारे सुहास राजेशिर्के यावर्षी नेमके आऊट ऑफ कव्हरेज कसे? अशी चर्चा सातार्‍यात सुरु झाली आहे. सुहास राजेशिर्के नाराज आहेत का? अशीही चर्चा सुरु असून त्यामुळे सातार्‍यातील राजकारण अचानक तापले आहे.

हेही वाचा

Back to top button