सांगली : विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन | पुढारी

सांगली : विट्यात राज्य विद्यापीठीय सेवक कृती समितीचे काम बंद आंदोलन

विटा; पुढारी वृत्तसेवा : सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीने राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. येथील आदर्श महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. याबाबत दखल घेईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा  इशारा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बरकत मुलाणी यांनी दिला आहे.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत. विट्यातील आदर्श महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी अंदोलनाला प्रतिसाद देत सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आश्वासित योजना पुनर्जिवीत करा, वेतनवाढीचा लाभ, रिक्त पदे भरण्यास परवानगी मिळावी, सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह वेगवेगळ्या मागण्या संघटनेने केल्या असल्याची माहिती बरकत मुलाणी यांनी दिली. या आंदोलनात सर्जेराव गायकवाड, संतोष शिंदे, राजेंद्र कांबळे, मिरासाहेब जमादार, सलिम मुलाणी, जनार्दन जावीर, सुभाष ठोंबरे यांच्यासह अनेक जण सहभागी आहेत.

       हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button