सांगली: गुळवंचीत विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू; एकावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली: गुळवंचीत विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू; एकावर गुन्हा दाखल

जत(सांगली), पुढारी वृत्तसेवा : गूळवंची (ता. जत) येथे तलावात पाणी आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस बेकायदेशीर वापर करत असलेल्‍या विजेचा शॉक लागून जागीच मृत्‍यु झाला. बाबासो शिवाजी उबाळे (वय. ३७) विजेचा शॉक लागून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत असुरक्षित व हयगयीने बेकायदेशीर विजेचा वापर केला याबाबतची तक्रार गौतमी बाबासो उबाळे यांनी जत पोलिसात केली होती. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विजय धनाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबसो उबाळे घरगुती वापरासाठी पाणी आणण्यासाठी कळशी घेऊन तलावात गेले होते.दरम्यान कळशीत पाणी भरत असताना पाय घसरला या वेळेला हुक टाकून असुरक्षित वापरत असलेल्या विद्युत वायरला हात लागला. विजेचा शॉक लागून बाबासो उबाळे यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना जत पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

देशात 5G ला मिळणार 600 Mbps चा स्पीड 

इचलकरंजी : लम्पीग्रस्त गायींना जीवदान, गो-पालकाकडून २० हजारांची औषधे भेट 

सांगली : लिफ्टच्या बहाण्याने भाजीपाला विक्रेत्या वृद्ध महिलेस लुटले

Back to top button