मिरज : ‘त्या’ व्यावसायिकाच्या मिरजेतील घराची झडती | पुढारी

मिरज : ‘त्या’ व्यावसायिकाच्या मिरजेतील घराची झडती

मिरज : पुढारी वृत्तसेवा
वड्डी (ता. मिरज) येथे फार्महाऊसवर छापा टाकून सीमा शुल्क विभागाने 22.83 किलो गांजा जप्त केला. त्या उद्योजकाच्या मिरजेतील बंगल्यात छापा टाकून झाडाझडती घेतली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी धिंगाणा घातला असल्याची माहिती मिळाली.

वड्डी येथील फार्महाऊसमध्ये अमली पदार्थ बनविले जात असल्याची माहिती पुणे येथील सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी 22.83 गांजा जप्त करून वॉचमन शंकर शिंगाणा याला अटक केली होती. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या मिरजेतील घरावर छापा टाकला. त्यावेळी व्यावसायिकाच्या कुटुंबियातील सदस्यांनी सीमा शुल्कच्या अधिकार्‍यांना घराबाहेरच अडवून धिंगाणा घालता. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांचा बंदोबस्त घेवून सीमा शुल्कने संबंधित व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली आहे. परंतु या झडतीत नेमके काय हाती लागले, हे मात्र समजू शकले नाही.

Back to top button