सांगली : जुन्या वाहनांचे पासिंग झाले आता दुप्पट | पुढारी

सांगली : जुन्या वाहनांचे पासिंग झाले आता दुप्पट

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जुन्या वाहनांच्या नूतनीकरणासाठी आणि फिटनेस प्रमाणपत्राचा खर्च आता दुप्पट झाला आहे. आरटीओ विभागाने हे दर जाहीर केले असून 1 एप्रिलपासून ते लागू करण्यात येत आहेत. यात नवीन नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र अथवा संपलेले जुने नोंदणीपत्र नूतनीकरण करणे, अशा दोन्हींसाठी ही वाढ होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.

ते म्हणाले, जुन्या वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरणासाठी उशिरा वाहन सादर केल्यास त्यासाठी दुचाकी वाहनांना प्रतिमहिना 300 रुपये आणि व्यावसायिक वाहनांसाठी महिना 500 रुपये भरावे लागतील. योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) मुदत संपल्यानंतर उशिरा नूतनीकरणाला येणार्‍या वाहनांना प्रत्येक दिवशी 50 रुपये जादा शुल्क आकारली जाणार आहे.

वाहनांचे दर रुपयात पुढील प्रमाणे कंसात जुने दर मोटारसायकल नवीन नोंदणी – 300 (300), जुन्या नोंदणीचे नूतनीकरण -1000 (300), तीनचाकी वाहन 600 (600), जुन्या नोंदणीचे नूतनीकरण 2500 ( 600), चारचाकी नवीन नोंदणी-600 (300) जुन्या नोंदणीचे नूतनीकरण – 5000 (300), आयात केलेले वाहन दुचाकी-तीनचाकी नवीन नोंदणी 2500 (2000), जुन्या नोंदणीचे नूतनीकरण 10,000 (2000 )
चारचाकी व त्या पेक्षा जादा चाकी अवजड वाहने नवीन नोंदणी -5000 ( 5000), जुन्या नोंदणीचे नूतनीकरण 40,000 (5000), अन्य वाहने नवीन नोंदणी 3000 (200), जुन्या नोंदणीचे नूतनीकरण 6000.

दरम्यान, पंधरा वर्षापेक्षा जास्त जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी वाहनांचे निरीक्षण शुल्कातही वाढ झाली आहे. ती पुढील प्रमाणे मोटारसायकल – मानवी पद्धतीने 400 (200) स्वचलीत 500 ( 400 ) तीनचाकी हलकी वाहने हस्तचलीत 800( 400), स्वचलीत 1000(600), अवजड प्रवासी वाहन हस्तचलित 1000(600) स्वचलीत 1500 (1000), पंधरा वर्षापेक्षा जास्त जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र मोटारसायकल 1000 (200), तीनचाकी 3500(200), हलके वाहन 7000 (200), मध्यम वाहन 10,000 (200), अवजड वाह12 , 500 ( 200).

दंड टाळण्यासाठी तातडीने नूतनीकरण कराः कांबळे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, ज्या लोकांच्या वाहनांची पासिंग मुदत संपली आहे त्यांनी दंड टाळण्यासाठी तातडीने नूतनीकरण करून घ्यावे.

हेही वाचलत का ?

Back to top button