रायगड: गोंडाळे येथे ‘जलसंधारण’च्या बंधाऱ्यावर सिमेंट मिक्सर मशीन उलटून कामगार ठार | पुढारी

रायगड: गोंडाळे येथे 'जलसंधारण'च्या बंधाऱ्यावर सिमेंट मिक्सर मशीन उलटून कामगार ठार

इलियास ढोकले

नाते: महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत महाड तालुक्यातील गोंडाळे देऊळकोंड येथे बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी आज (दि.२५) दुपारी साडेतीनच्या सुमारास सिमेंट मिक्सर मशीन उलटून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका कामगारास वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यंत्रणेला यश आले.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळामार्फत महाड तालुक्यातील नाते विभागातील गांधारी व ग्रामीण भागातील नद्यांवर बंधारे बांधण्याची कामे मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत. महाड तालुक्यातील गोंडाळे सुतारकोंड येथे नदीवरील सुरू असलेल्या बंधारा कामादरम्यान मिक्सर मशीन उलटून झालेल्या या अपघातामध्ये मैनुद्दीन अन्सारी या परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर सुमित ढाणे हा कामगार सुदैवाने बचावला.

या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी, पोलीस कर्मचारी आणि महाशक्ती ॲम्बुलन्स असोसिएशनची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमी कामगारास  महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button