रायगड : तोतया टी.सी. पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

रायगड : तोतया टी.सी. पोलिसांच्या जाळ्यात

रोहे, पुढारी वृत्तसेवा : गणपती उत्सव सुरू असून मोठ्या प्रमाणात चाकरमनी मनी आपल्या गावी जात आहेत. या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात आले आहेत. यातीलच ०११७२ ही गाडी मुंबईकडे येत असताना या गाडीत प्रवासांचे तिकीट तपासताना नकली टी. सी. ला कामावर असलेल्या टीसीने रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने पकडले आहे.

०११७२ ही गणपती विशेष गाडी रत्नागिरीहून मुंबईकडे येत असताना रत्नागिरी व चिपळूण दरम्यान रात्री एक ते दोनच्या दरम्यान एक व्यक्ती गाडीत चढून आपण टीसी असल्याचे सांगत प्रवासांचे तिकीट तपासले. काही प्रवाशांकडून पैसेही घेतले. याच दरम्यान या गाडीत कामावर असलेले मंगेश साळवी, प्रवीण लोके हे रेल्वेचे टीसी तिकीट चेक करण्यासाठी आले असताना प्रवाशांनी आपले तिकीट आत्ताच तपासल्याचे सांगितले.

यावेळी या टि.सी.ना शंका आली. त्यांनी त्वरित मागोवा घेत नकली टीसीला रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले. त्या नकली टीसीने अनेकांकडून पैसेही घेतले होते. त्या नकली टीसीला रेल्वे पोलिसांनी रोहा रेल्वे स्थानकात उतरवून रोहा पोलिसांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या संबंधित अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. ३२ वर्षीय नकली टी.सी हा पालघर येथील असल्याचे रेल्वे पोलीसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button