Shiv Sena name and symbol: शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची सुनावणी पुन्‍हा लांबणीवर

Shiv Sena name and symbol
Shiv Sena name and symbol

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज  सोमवारी (दि.१८) सर्वोच्च न्यायालयात हाेणारी सुनावणी पुन्‍हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत  ठाकरे गटाकडून  वेळ मागण्‍यात आला. आता तीन आठवड्यानंतर यावर सुनावणी हाेणार आहे. दरम्‍यान, विधानसभा अध्‍यक्षांनी अपात्र आमदारांबाबत घेण्‍याच्‍या निर्णयाची सुनावणी सुरु झाली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत  ठाकरे गटाकडून  वेळ मागण्‍यात आला. यावर न्‍यायालयाने तीन आठवड्यांची मूदत दिली आहे. त्‍यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी हाेणार आहे.

आमदारांच्या अपात्रताप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी सुरु

सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिकाही ठाकरे गटाच्या वतीने दाखल केली होती. त्या याचिकेवरही आजच सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. त्‍यानुसार आज या याचिकेवर सुनावणी सुरु झाली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news