रोहा येथे चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन क्रांती पँथरचे आंदोलन | पुढारी

रोहा येथे चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन क्रांती पँथरचे आंदोलन

रोहे; महादेव सरसंबे : रोहा तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड – माणगावमध्ये असलेल्या तिसे रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत कांबळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ रोहा शहरातील जुना मच्छी मार्केट येथे बहुजन क्रांती पँथरच्यावतीने टायर जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

२१ ऑगस्टला चंद्रकांत कांबळे यांची कोकण रेल्वे मार्गावरील तिसे रेल्वे गेटवर हत्या झाली होती. हत्येनंतर रायगडचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे-पाटील यांनी घटनेची पाहणी केली होती. पोलिस दलाच्यावतीने तपासासाठी ८ पथके नेमण्यात आली होती. परंतू अद्याप मारेकऱ्याचा तपास लागला नसल्याने बहुजन समाज व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी बहुजन क्रांती पँथरच्यावतीने जुना मच्छी मार्केट येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह पथकाने येऊन वाहतूक कोंडी सोडवली.

यावेळी बहुजन क्रांती पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल सोळंकी, पँन्थर आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशील जाधव, कर्जत तालुका युवा अध्यक्ष रोहित जाधव, जिल्हा अध्यक्ष रोशन मोरे, युवा अध्यक्ष अमित केदारे, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

 

Back to top button