पनवेल : घरफोडी प्रकरणातील फरार आरोपी काही तासातच पोलिसांच्या तावडीत | पुढारी

पनवेल : घरफोडी प्रकरणातील फरार आरोपी काही तासातच पोलिसांच्या तावडीत

पनवेल; विक्रम बाबर : अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस नवी मुंबईतील तळोजा वसाहत परिसरात घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला तळोजा पोलिसांनी अटक करून गजाआड केले होते. मात्र आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस ठाण्यातून धूम ठोकल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. पोलीस पथकाने फरार झालेल्या संशयिताचा शोध सुरू केला आणि  अवघ्या १० तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या.

  • Goa News | पबमध्ये युवतीशी सलगी करणे पडले महागात, IPS अधिकाऱ्याला DIG पदावरुन हटवलेअजय शिवराम वाघमारे (वय २२) रा. नावडेगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे. अजय याला तळोजा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. तो अंधाराचा फायदा घेऊन तळोजा परिसरात घरफोड्या करत असत. काही दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने तळोजा परिसरात घरफोड्या करून वस्तू चोरल्याच्या तक्रारी या परिसरातील रहिवाशींनी तळोजा पोलीस ठाण्यात केल्या होत्या. त्या तक्रारीनुसार तळोजा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यागुन्ह्या अंतर्गत पोलिसांनी अजयला घोरफोड्या केल्याप्रकरणी अटक करून तळोजा पोलीस ठाण्यात आणले होते. नंतर त्याला कोर्टात हजर केले. कोर्टातून त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कस्टडीट ठेवण्यात येत होते. यादरम्यान पोलिसांना झटका देत त्याने धूम ठोकली. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. तो नावड्या खाडी पात्रात लपून बसल्याची माहिती पोलिसांना  मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खाडी पात्रात  शोध सुरू केला आणि खाडी पात्रात लपलेल्या अजयला पुन्हा अटक केली, अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी  सतीश गोरे यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली.

हेही वाचा : 

Back to top button