नगर : पुढारी वृत्तसेवा : चासनळी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने एका आदिवासी महिलेची उपकेंद्रात प्रसूती करावी लागली. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी 'पुढारी'ने लक्ष वेधताच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात चासनळी केंद्रातील एका वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांना निलंबित केले असून, अन्य एकाला नोटीस बजावण्यात आली आहे. रुग्णवाहिका चालक संजय शिंदे याला कामावरून दूर करण्याची कारवाई केल्याचे समजले. कोपरगाव तालुक्यातील चासनळी आरोग्य केंद्रात साहिल खोत व साक्षी शेटी या दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे.