Goa News | पबमध्ये युवतीशी सलगी करणे पडले महागात, IPS अधिकाऱ्याला DIG पदावरुन हटवले | पुढारी

Goa News | पबमध्ये युवतीशी सलगी करणे पडले महागात, IPS अधिकाऱ्याला DIG पदावरुन हटवले

पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर : गोव्यात एका पबमध्ये सलगी करण्याचा प्रयत्न करत गैरवर्तन करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या युवतीने कानाखाली वाजवली. कळंगुटमधील एका पबमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. ए. कोन यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आहे. (Goa News)

आयपीएस अधिकारी डॉ.  ए. कोन यांना पोलीस महासंचालकांना (डीजीपी) रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेनंतर डॉ. ए. कोन यांच्याकडून पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्याने कळंगुटमधील पबमध्ये महिलेशी गैरवर्तणूक केल्याचा मुद्दा गोवा विधानसभेत उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधीत अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले होते. (Goa News)

हेही वाचा : 

Back to top button