Loksabha election : आढळरावांच ठरलं ! ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश | पुढारी

Loksabha election : आढळरावांच ठरलं ! 'या' दिवशी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय.. शिरूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना रोखण्यासाठी महायुतीकडून पुन्हा एकदा 2019 चा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता आहे.. तर महायुतीकडून कोण लढणार हा सस्पेन्स आजवर कायम होता त्याला आता फुल स्टॉप लागण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये असणारे शिवाजीराव आढळराव पाटील हेच महायुतीकडून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते… २६ मार्च रोजी मतदारसंघात मोठा मेळावा घेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल आहे….

शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. तीन वेळा शिरूरचे खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील सद्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत उमेदवारी दिली जाणार असल्याचं आता निश्चित झाल आहे. आज अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी २६ मार्च रोजी मतदारसंघात मोठा मेळावा घेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मतदारसंघातील जनतेच्या साक्षीने मंगळवारी मेळावा पार पडणार आहे. काही नसताना पहिली निवडणूक ३० हजारांच्या मताधिक्याने तर दुसरी १ लाख ८० हजाराने तर तिसरी ३ लाख ३ हजारांनी विजय झाला. यंदाच्या निवडणुकीतील विजय त्यापेक्षा अधिक मताधिक्याने होईल असा विश्वास आढळराव यांनी व्यक्त केलाय…

हेही वाचा

Back to top button