सोमालियातील ३५ समुद्री चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

सोमालियातील ३५ समुद्री चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाने एमव्ही रुएन या जहाजातून पकडण्यात आलेल्या ३५ सोमालियातील समुद्री चाच्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भारतीय नौदलाने ऑपरेशन संकल्प आणि इतर मोहिमांमध्ये ४५ भारतीय आणि ६५ आंतरराष्ट्रीय नागरिकांचा समावेश असलेल्या ऑपरेशन्समध्ये ११० लोकांचे प्राण वाचवले आहेत. तसेच १३ हल्ल्यांच्या घटनांना प्रतिसाद दिला आहे. अलिकडेच चाचेगिरीशी संबंधित वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २७ पाकिस्तानी आणि ३० इराणींसह १०२ लोकांचे प्राण वाचवल्यांचेही भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button