पाच हजार घरांची म्हाडाकडून लॉटरी; आचारसंहितेच्या अगोदर येणार जाहिरात | पुढारी

पाच हजार घरांची म्हाडाकडून लॉटरी; आचारसंहितेच्या अगोदर येणार जाहिरात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वतीने (म्हाडा) मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्जाच्या नोंदणीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या वर्षातील ही पहिली सोडत ठरणार आहे. यामध्ये 20 टक्के योजनेंतर्गत 1700 घरांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या अगोदरच ही जाहिरात येणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सोडतीमध्ये 20 टक्के योजनेंतर्गत 2552 घरांपैकी आतापर्यंत 2061 पात्र अर्जदारांना घरे देण्यात आली आहेत. त्यातून म्हाडाला 14 कोटी 86 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच उर्वरीत 3311 सदनिकांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्याची कार्यवाही येत्या दहा दिवसांत होणार असल्याचेही मुख्य अधिकारी पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button