धक्कादायक ! शरीरसंबंधास नकार दिल्याने त्याने केलं असं काही.. | पुढारी

धक्कादायक ! शरीरसंबंधास नकार दिल्याने त्याने केलं असं काही..

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शरीरसंबंधाला नकार दिल्याने महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली, तसेच आगीमुळे घरातील साहित्यही जळाले. हा धक्कादायक प्रकार बारामतीत गुरुवारी (दि. 1) रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती शेडगे (रा. जळोची, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला भाडोत्री घरामध्ये राहते. तिने एका पतसंस्थेकडून काही रक्कम काढून आणली होती.

ती कपाटामध्ये ठेवत असताना शेडगे हा तेथे आला. त्याने हातात पेट्रोलची बाटली आणली होती. ‘तू माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवणार का,’ अशी विचारणा केली. महिलेने ‘त्याला तू घराबाहेर जा’, असे सांगितले. त्यावर चिडून त्याने बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि काडीपेटीतून काडी ओढून तिला पेटवून दिले. त्यानंतर तो तेथून पळून गेला. महिलेच्या साडीने पेट घेतला, तशा स्थितीत महिला घरातून बाहेर ओरडत आली. शेजारील लोकांनी आग विझवत तिच्या नातेवाइकांना माहिती दिली. त्यांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आगीमुळे घरातील साहित्यही जळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

 

Back to top button