Pimpri News : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात वैद्यकीय विद्यार्थ्यांना दीक्षारंभ | पुढारी

Pimpri News : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात वैद्यकीय विद्यार्थ्यांना दीक्षारंभ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सभागृहात बी.ए.एम.एस. आणि बी. एच. एम. एस. तसेच पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी खासदार डॉ. हिना गावित या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात खा. गावित यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वानुभव सांगत, नवीन शिक्षणाचा प्रवास यशस्वी आणि सुखकर मार्ग सांगून मार्गदर्शन केले.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी विद्यापीठात उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असून, त्याचा लाभ घेऊन आई -वडील आणि विद्यापीठाचे नाव उच्चस्तरावर न्यावे असा सल्ला दिला. कुलगुरू डॉ. एन जे. पवार यांनी ज्ञान मिळविण्याची भूक वाढवून, स्वतःला ओळखून नव्या जीवनाची सुरुवात करा असा पाठ देऊन घरापासून सूर आलेल्या विद्यार्थ्यांना बळ दिले. प्रा. डॉ. मृदुला जोशी यांनी दीक्षारंभप्रसंगी आयुर्वेदाच्या चरक संहितेत 8 व्या अध्यायात असणार्‍या दीक्षाविधी वर्णनानुसार संस्कृत भाषेतून, विद्यकीय शिक्षण घेत असताना स्वतःची जबाबदारी ओळखून,भविष्यात चांगले डॉकटर होऊन समाजसेवा घडावी याची शपथ दिली.

प्रो. चान्सलर डॉ. स्मिता जाधव यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही प्राचीनशास्त्रांचे पारंपरिक आणि नवीन युगाचा समन्वय करून उत्साहाने वैद्यकीय शिक्षणाचे यशस्वी मार्गक्रमण करावे आणि सामाजिक बांधिलकी घ्यावी असे सांगून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. दीक्षारंभ कार्यक्रमाला डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन प्रवासात आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि वेळोवेळी पाठिंबा असून, विद्यार्थ्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मा यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. डॉ. स्मृतिका तावरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

Back to top button