Pimpri News : थंडीचे आगमन; वातावरणात गारवा | पुढारी

Pimpri News : थंडीचे आगमन; वातावरणात गारवा

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री बोचरी थंडी जाणवत आहे. नागरिकांनी आता ऊबदार कपडे कपाटाबाहेर काढायला सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवड शहराचे कमाल तापमान 33 अंश इतके असून किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. पहाटे थंडीचा जोर असल्याने कामानिमित्त बाहेर पडणार्यांनी स्वेटर, जॅकेट,स्कार्फ, मफलर घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.

सकाळी व्यायाम व फिरायला जाणारे नागरिकदेखील ऊबदार कपड्यांमध्ये दिसत आहेत. तसेच सायंकाळी सहानंतरदेखील वातावरणात गारठा असल्याने कर्मचारी नागरिक ऊबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत. रात्रीच्या वेळी पहारा देणारेदेखील शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. थंडीमुळे चहा, कॉफी, वडापावसारख्या पदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. सकाळी व सायंकाळी थंडी आणि दुपारी ऊन यामुळे त्वचा कोरडी पडू लागली आहे.

हेही वाचा

Back to top button