Pune : वेल्हे तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू | पुढारी

Pune : वेल्हे तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दुर्गम भागात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली. बहुतांश गावांत अटीतटीच्या लढती होत आहेत. कुरण खुर्द ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 7 सदस्य आहेत. कुरण खुर्द-पानशेत ग्रामपंचायतीसाठी सर्वात अधिक उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी 4 व 9 सदस्यपदासाठी एकूण 20 उमेदवार आहेत. शेनवड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या :

त्यासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. अंबवणे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सरपंचपदासाठी 2 उमेदवारांत चुरशीची लढत आहे. माणगाव ग्रामपंचायतीच्या सर्व पदांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी 3 उमेदवार आहेत.
साईव बुद्रुकच्या सरपंचपदासाठी शैक्षणिक पात्रता नसल्याने उमेदवारी अर्ज बाद झाला, त्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. प्रभाग 2 च्या सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, 1 व 3 प्रभागांच्या सदस्यपदांसाठी 12 उमेदवार आहेत. कुरण बुद्रुकच्या सरपंचपदासाठी 3 उमेदवार आहेत. तसेच प्रभाग 1 व 2 मध्ये 8 उमेदवार आहे. कादवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 2, तर सदस्यपदासाठी 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Back to top button