Pune news : शरद पवार, दिलीप वळसे येणार एकाच मंचावर | पुढारी

Pune news : शरद पवार, दिलीप वळसे येणार एकाच मंचावर

नारायणगाव : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 2023-2024 च्या गळीत हंगामाचा तसेच आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ 2 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील असणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
ते म्हणाले की, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपच्या आशा बुचके, शिवसेनेचे माऊली खंडागळे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button