Nawab Tajdar : नॅशनल क्रश; ‘हिरामंडी’ चा ‘ताहा शाह’ कान्समध्ये पोहोचताच फॅन्स रडले ढसाढसा | पुढारी

Nawab Tajdar : नॅशनल क्रश; 'हिरामंडी' चा 'ताहा शाह' कान्समध्ये पोहोचताच फॅन्स रडले ढसाढसा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी: द डायमंड बझार’ ही वेबसीरीजला आता रिलीज होवून तिसरा आठ‍वडा झाला आहे. ही वेबसीरीज पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. यातील बॉलिवूड अभिनेत्री शर्मीन सहगल, रुच्चा चड्ढा, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, संजिदा शेख याच्यासोबत सर्वच कलाकारांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याच दरम्यान ‘हिरामंडी’ चा अभिनेता नवाब ताजदार बलोच हा फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला आहे. यामुळे त्याची ओळख नॅशनल क्रश बनली आहे. देशातच नाही तर तो परदेशातही प्रसिद्ध झोतात आला आहे.

Nawab Tajdar Baloch हे  माहित आहे काय? 

  • ‘हिरामंडी: द डायमंड बझार’ या वेबसीरीजमध्ये अभिनेता नवाब ताजदार बलोचची मुख्य भुमिका आहे.
  • नवाब ताजदार बलोचने ‘हिरामंडी’ मध्ये ‘ताहा शाह’ ची साकारली आहे.
  • देशासोबत परदेशातही नवाब ताजदार बलोचची क्रेझ पाहायला मिळाली.

‘हिरामंडी’ च्या अभिनेत्याची परदेशात क्रेझ

‘हिरामंडी’ चा बॉलिवूड अभिनेता नवाब ताजदार बलोच हा कान्स फिल्म फेस्टिव्हल पोहोचताच चाहत्यांनी त्याच्या नावाचा एकच कल्लोळ केला. जोर- जोराजोरात त्याचे फॅन्स ‘ताजदार, ताजदार, ताजदार…’ असे म्हणत ओरडत होते. ‘हिरामंडी’ मध्ये नवाबने ‘ताहा शाह’ ची मुख्य भूमिका साकारली आहे. ताजदारची कान्समध्येच नाही तर परदेशातही क्रेझ पाहायला मिळत आहे. कान्ससोबत परदेशातीलही फॅन्स ताजदारचे भरभरून कौतुक केलं आहे. कान्स सोहळ्यात त्याने ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट कलरच्या शर्टवर स्कॉय ब्लू कलरचे ब्लेझर परिधान केलं होतं. मेस्सी हेअर स्टाईल आणि डोळ्यावर चष्मा परिधान करून त्याने त्याचा लूक पूर्ण केला होता.

फॅन्स ढसाढसा रडले

नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत ताजदारने मलेशियातील काही फॅन्संना भेटल्याचे आणि त्याच्याकडून खूप प्रेम मिळाल्याचे सांगितले आहे. यासोबत त्याने फॅन्स डोळ्यात पाणी भरून ढसाढसा रडल्याचाही एक किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीपूर्वी मी एका उपस्थित असलेल्या काही फॅन्सच्या टोळीला भेटलो. फॅन्स मला पाहून अवाक्‌ झाले आणि जोरजोरात ओरडू लागले. माझी नजर त्याच्यावर पडताच यातील काही फॅन्स आनंदाने रडूही लागले. याशिवाय काही फॅन्सनी जवळ येवून माझ्यासोबत फोटो आणि व्हिडिओही काढले. यापुर्वी अशी प्रतिक्रिया मी कधीच पाहिली नव्हती. मला खूप आनंद झाला. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले. असे ताहाशाहने सांगितले.

‘हिरामंडी’मध्ये ही भूमिका

‘हिरमंडी: द डायमंड बझार’ या बेवसीरीजमध्ये ताजदारने ‘ताहा शाह’ नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. जो शाही मोहल्ल्यातील तवायफ आलमजेब (शर्मीन सहगल) च्या प्रेमात आहे. पण त्याच्या मनातही क्रांतीची आग पेटते. आणि तो पेटून उटतो. ताहा शाहचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Taha Shah Badussha (@taahashah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Back to top button