Pune Railway News : रेल्वेच्या पुणे-कोल्हापूर दरम्यान ११४ रेल्वे सेवा | पुढारी

Pune Railway News : रेल्वेच्या पुणे-कोल्हापूर दरम्यान ११४ रेल्वे सेवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते पुणे दरम्यान दररोज ११४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे-कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

…अशी आहे विशेष गाड्यांची सेवा…

छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे दैनिक विशेष (११४ सेवा)

  • 01024 स्पेशल दि. ५ नोव्हेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ (५७ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री ११.३० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल.
  • 01023 स्पेशल पुणे येथून दि. ६ नोव्हेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ (५७ फेऱ्या) दररोज रात्री ९.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०५.४० वाजता पोहोचेल.
  • ही गाडी कोल्हापूर, वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज जंक्शन, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी आणि सासवड रोड, पुणे
  • गाडीला एकूण १६ डब्बे, १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.

Back to top button