मराठा आरक्षण प्रकरण : पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण | पुढारी

मराठा आरक्षण प्रकरण : पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून ५० टक्केच्या आतमधील आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अनिल ताडगे, रेखा कोंडे, प्रफुल्ल गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक भागात साखळी उपोषणास बसण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः आंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले आहे.. त्यानुसार पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मराठा कांती मोर्चाचे वतीने साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. तसेच शहरातील व जिल्हयातील विविध भागांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना मेळावे, कार्यक्रमास येवू नये व समाजाने त्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार आहेत.

त्याच बरोबर शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजीनगर येथून कँडल मार्च सायंकाळी ६.३० वा निघून छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन पर्यंत येणार आहे. मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणेकरीता विविध ठिकाणी उपोषण, कॅडलमार्चचे आयोजन करून शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन कुंजीर यांनी यावेळी केले.

 

Back to top button