Pune news : अजित पवारांच्या हस्ते गळीत हंगामाची सुरुवात केल्यास आंदोलन

अजित पवार
अजित पवार
बारामती : पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला शनिवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून यासंबंधीचे निवेदन कारखान्याला देण्यात आले. तसेच माळेगाव पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस निरीक्षक किरण अवचर यावेळी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय व्यक्तिंना राज्यात ठिकठिकाणी गावबंदी करण्यात आलेली आहे. असे असताना माळेगाव कारखान्याने शनिवारी पवार यांच्या हस्ते गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राजकीय नेत्यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे.  राजकीय व्यक्तिंच्या हस्ते गळीत हंगाम सुरु करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्य मराठा जमून तीव्र आंदोलन छेडतील, त्याची जबाबदारी कारखान्यावर राहिल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान बुधवारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखले असता पवारांच्या सभेत एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना सभा स्थळापासून बाजूला काढले. यानंतर आता पवार यांच्या हस्ते माळेगावच्या हंगामाची सुरुवात होणार असून तेथेही त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने आत्तापासूनच व्युहरचना कऱण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news