Chhatrapati Sambhajiraj : मनोज जरांगे यांनी पाणी घेऊन उपोषण करावे; छत्रपती संभाजीराजेंची विनंती

Chhatrapati Sambhajiraj : मनोज जरांगे यांनी पाणी घेऊन उपोषण करावे; छत्रपती संभाजीराजेंची विनंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या जीवापेक्षा समाजाला मोठे मानतो, त्यांना ताकद, बळ देणे, हे छत्रपती घरण्याचे कर्तव्य आहे. आमरण उपोषण काय असते, हे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची चिंता मला आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण पुढे सुरूच ठेवावे. परंतु त्यांनी पाणी तरी प्राशन करावे, अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी केली. Chhatrapati Sambhajiraj

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे आजपासून (दि.२५) पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.Chhatrapati Sambhajiraj

संभाजी राजे म्हणाले की, समाजासाठी जो कष्ट करतो, त्याला ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे. मनोज जरांगे यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता मनोज जरांगे समाजासाठी लढा देत आहेत. त्यांना ताकद देण्याची काम छत्रपतीं घराण्याचे आहे. त्यासाठी कोल्हापूरहून दसऱ्याचा कार्यक्रम आटपून थेट मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आलो आहे.

मराठा समाजातील लेकरांवर अन्याय होत आहे. समाज विखुरला गेला आहे. मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. मी मनोज जरांगे यांचे अनेक उषोषण बघितली आहेत. त्यामुळे मला तुमच्या तब्येतीची चिंता आहे. त्यामुळे तुम्ही उपोषण सुरू ठेवा, परंतु पाणी तरी प्या, अशी विनंती करतो.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news