Pune Railway : धक्कादायक! पुण्यात रेल्वेचा भीषण अपघात घडविण्याचा प्रयत्न फसला | पुढारी

Pune Railway : धक्कादायक! पुण्यात रेल्वेचा भीषण अपघात घडविण्याचा प्रयत्न फसला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे ट्रॅकवर मोठ-मोठ्या दगडी रचून रेल्वेचा भीषण अपघात करण्याचा प्रयत्न पुणे विभागात करण्यात आला. मात्र, रेल्वे गार्डसह खबऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांचा हा डाव फसला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच रेल्वेची सुरक्षा यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली.  या घटनेमागे कोणाचा हात होता, असा अपघात घडवण्यामागे कोण आहे, याची माहिती रेल्वे इंटेलिजन्स यंत्रणेकडून घेतली जात आहे. तसेच रेल्वे सुरक्षा बलाकडून (आरपीएफ) सुद्धा या संदर्भात तपास सुरू आहे. (Pune Railway)

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.६) चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास आकुर्डी ते चिंचवडदरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकवर दगडी रचल्याचे पाहायला मिळाले. त्याची रेल्वे कंट्रोल रूमला माहिती मिळताच रेल्वेच्या सर्व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. तसेच चिंचवड येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक या घटनेचा तपास करत आहेत. (Pune Railway)

या मार्गावरून पुणे -मुंबई दरम्यान अनेक रेल्वे गाड्या धावतात. सायंकाळच्या सुमारास तर या गाड्यांचा पिक अवर असतो, कदाचित एखाद्या गाडीचा अपघात झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात होता, हे कृत करणाऱ्यांची वृत्ती खूप वाईट आहे. दोषींना शोधून प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button