यंदा सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल डिजिलॉकरमध्ये; असे उघडा खाते | पुढारी

यंदा सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल डिजिलॉकरमध्ये; असे उघडा खाते

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहे. त्यातच सीबीएसईने यंदा प्रथमच डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाइट वळसळश्रेलज्ञशी. र्सेीं. ळप वर दहावी-बारावीचा निकाल पाहता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. सीबीएसईकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु 20 मेनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल हा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट digilocker. gov. in वर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, डिजिलॉकरवरही पाहता येणार आहे. मागील वर्षी सीबीएसईने दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी, तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी आता निकाल लागण्याची वाट पाहत आहेत.

असे उघडा खाते

प्रथम डिजिलॉकरच्या अधिकृत वेबसाइट वळसळश्रेलज्ञशी.र्सेीं.ळप वर जावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचा वर्ग निवडावा लागेल. विद्यार्थ्यांना शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाकावा लागेल. मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि अन्य तपशील भरावा लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल थेट डिजिलॉकरच्या खात्यावर मिळेल. वेबसाइटप्रमाणे डिजिलॉकर अ‍ॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे लागेल.

हेही वाचा

Back to top button