खडकवासला साखळीत अर्धा टीएमसीची भर | पुढारी

खडकवासला साखळीत अर्धा टीएमसीची भर

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या पाच दिवसांत झालेल्या रिमझिमने खडकवासला धरणसाखळीत जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची भर पडली. यामुळे धरणसाखळीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणसाखळीत 27.29 टीएमसी म्हणजे 93.63 टक्के साठा झाला होता. रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगाव धरण क्षेत्रात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. खडकवासला-सिंहगड भागात तुरळक अपवाद वगळता पावसाची उघडीप होती. पावसामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली नाही. मात्र, चारही धरणांत मंदगतीने भर पडत आहे. मंगळवारी वरसगाव पुन्हा शंभर टक्के भरले. पानशेतही जवळपास शंभर टक्के भरले आहे.

खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, की पाच दिवसांच्या पावसामुळे धरणसाठ्यात 0.33 टीएमसी पाण्याची वाढ झाली. तसेच, पाच दिवसांत जवळपास 0.11 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत धरणसाठ्यात जवळपास अर्धा टीएमसी पाणी जमा झाले. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 5, पानशेत येथे 6 , वरसगाव येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासलात उघडीप होती.

हेही वाचा :

Back to top button