सासवड : मोटारींच्या केबल चोरणार्‍या पाच जणांना अटक | पुढारी

सासवड : मोटारींच्या केबल चोरणार्‍या पाच जणांना अटक

सासवड : पुढारी वृत्तसेवा : केतकावळे (ता. पुरंदर) येथील तलावातील मोटारीच्या केबल चोरणार्‍या पाच जणांना सासवड पोलिसांनी अटक केली. अक्तार जमीर शेख (रा. येवलेवाडी, पुणे मूळ रा. लातूर), लवकुश कुमार रैदास व विनय नरसिंग साहू (रा. येवलेवाडी, मूळ रा. मंडला, मध्य प्रदेश), धनेंद्र रमेश चौधरी (रा. येवलेवाडी मूळ रा. सहपुरा, दिंडोरी), राहुल गौतम बोरकर (रा. येवलेवाडी, मूळ
रा. पातूर, अकोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतकावळे तलावातील अतुल किसन बाठे (रा. देवडी, ता. पुरंदर), परशुराम बाठे, राजाराम बाठे, बाळू खाटपे, लीना चव्हाण, योगेश मेमाणे, रामदास बाठे, तानाजी भोसले, लक्ष्मण भोसले, रामचंद्र भोसले या शेतकर्‍यांच्या केबल चोरट्यांनी पळवून नेल्या. यातील आरोपींना अटक करून पोलिसांनी 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलिस तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलिस नाईक जब्बार सय्यद, गणेश पोटे, नीलेश जाधव, सुहास लाटणे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

Maratha Reservation Protest: गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार

पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; 19 जणांवर कारवाई

Back to top button