पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; 19 जणांवर कारवाई | पुढारी

पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; 19 जणांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 19 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या कारवाईत 10 महिलांसह 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार पेठ भागातील वेश्यावस्तीतील कुंटणखान्यात बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या समाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. बांगलदेशी महिलांबरोबर त्यांचे निकटवर्तीय वेश्यावस्तीत वास्तव्य करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्यावस्तीत छापा टाकून 10 बांगलादेशी महिलांसह 19 जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम 1950, तसेच परकीय नागरिक आदेश 1978 अन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब कर्पे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण, अमित जमदाडे, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.

पुण्यात अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील तीन ते सहा महिन्यांपासून संबंधित व्यक्ती या ठिकाणी राहत असल्याचे प्राथमिक तपासात दिसत असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

– रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

हेही वाचा

अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड : फरारी महिला पुण्यातून अटकेत

पुणे : पालिका करणार होर्डिंगची तपासणी

कोल्हापूर : प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

Back to top button