Maratha Reservation Protest: गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार | पुढारी

Maratha Reservation Protest: गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा: गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो. पोलिसांमुळे मराठा आंदोलन चिघळल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (Maratha Reservation Protest)

अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाकाळा (अंकुशनगर, ता.अंबड) येथील मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांची शनिवारी (दि.२) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास भेट घेऊन धीर दिला. (Maratha Reservation Protest)

जालना शहरात ८ सप्टेंबररोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती. त्यामुळे हे आंदोलन दडपण्यात आले आहे. गृह विभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पोलिस प्रशासनामुळे प्रकरण चिघळल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यावेळी पदाधिकारी, आंदोलक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button