पिंपरी पंतप्रधान आवास योजना : 938 घरांसाठी 10 हजार 108 अर्ज | पुढारी

पिंपरी पंतप्रधान आवास योजना : 938 घरांसाठी 10 हजार 108 अर्ज

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या मोहननगर (आकुर्डी) आणि पिंपरी (उद्यमनगर) गृहप्रकल्पांसाठी एकूण 10 हजार 108 अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यमनगर येथील गृहप्रकल्पातील एकूण 370 सदनिकांसाठी 4 हजार 638 अर्ज आहेत. तर, मोहननगर येथील 568 सदनिकांसाठी 6 हजार 693 अर्ज आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. तेथील सदनिकांसाठी 28 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 10 हजार 500 रुपये शुल्क भरणे बंधनकारक केले होते. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे असलेल्या पात्र अर्जाची लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. त्यातून लाभार्थी व प्रतीक्षा यादी तयार करून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. मुदतीमध्ये स्वहिस्सा भरणार्‍या लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. मोहननगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रुपये आणि उद्यमनगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रुपये स्वहिस्सा लाभार्थ्यांस भरावा लागणार आहे.

हेही वाचा

गोंदिया : विजेच्या धक्क्याने तीन बिबट्यांचा मृत्यू

हरेगाव मारहाण प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यात निषेध

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुळे रक्ताच्या गुठळीचा वाढतो धोका

Back to top button