गोंदिया : विजेच्या धक्क्याने तीन बिबट्यांचा मृत्यू | पुढारी

गोंदिया : विजेच्या धक्क्याने तीन बिबट्यांचा मृत्यू

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेगाव वन परिक्षेत्रातील बोरगाव बिट क्षेत्रात सोमवारी (दि.२८)एका मादी बिबट्यासह दोन बिबट्याच्या बछड्यांचे मृतदेह कुंजलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेने वन्यजीव विभागात एकच खळबळ उडाली असून ही घटना आज (दि.२९) सकाळी उघडकीस आली.

मादी बिबट्याचे वय अंदाजे ६ वर्ष तर बछडे २ वर्षाचे असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. या तिन्ही बिबट्यांचे शव कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांचा मृत्यू होऊन ८ दिवस लोटले असल्याचे सांगण्यात आले. सदर बिबट्यांची विजेचा करंट लाऊन शिकार करण्यात आली असून या प्रकरणी परिसरातील ८ संशयितांना वनविभाने ताब्यात घेतले आहे. त्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

आज सकाळी बोरगाव बिट गट क्रमांक ४८१ जंगल शिवारात बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. वनाधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवरी तालुका वनाने व्यापला असून परिसरात वन्यजीवांच्या शिकारीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा :

Back to top button