ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम | पुढारी

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र, आता शाळा पूर्णक्षमतेने सुरू असूनदेखील काही शाळांकडून जुनी पध्दत राबविली जात आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे मत आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
कोरोना नसल्याने पूर्णक्षमतेने शाळा सुरू आहेत. मात्र, तरीही आजदेखील काही शाळा ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवत आहेत. त्यातच मोबाइलचा वापर करून अभ्यास करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोकरीत व्यस्त व वेळेभावी पालकांकडून मुलांना ऑनलाइन अभ्यासासाठी प्रोसाहित केले जाते.

त्यामध्ये धनिक कुटुंबांकडून महागडे मोबाईल, त्यामध्ये टॅब, लॅपटॉप पाल्यांना दिले जात आहेत. तसेच काही क्लासेसही सध्या ऑनलाइन पध्दतीने चालविली जातात. नोकदार पालकांकडून या क्लासेसना सर्वाधिक पसंती दिली जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत याचे प्रमाण जास्त आहे.

अशा समस्या होऊ शकतात
1) मोबाईल अति वापरण्यात आल्याने त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. सतत मोबाईल हाताळल्यास डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे कोरडे पडणे, झोप न लागणे, असे त्रास होऊ शकतात.
2) जास्त वेळ मोबाईलचा वापर केल्यास हाताला मुंग्यादेखील येऊ शकतात.
3) स्किन टाईप जास्त असल्यास डोकेदुखीचा त्रासदेखील मुलांना होऊ शकतो.

विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन पध्दतीने समजत नाही. समोरासमोर विद्यार्थ्यांना पूर्णक्षमतेने सांगता येते. त्यामुळे ऑफलाइन शिक्षण दहावीपर्यंत होणे गरजेचे आहे. मात्र, ऑनलाइनमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात.
                                                                     – शशिकांत हुले, पर्यवेक्षक 

हेही वाचा :

पुणे-सातारा महामार्गावरील धोम-बलकवडी कालव्यात कार कोसळली

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा समुपदेशकविनाच

Back to top button