खानापूरला सर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

खानापूरला सर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीत शिकणारा रघुनाथ मारुती भालेराव (वय 5) हा अंगणात खेळत असताना त्यास सर्पदंश झाला. उपचारा दरम्यान बुधवारी (दि.9) त्याचा मृत्यू झाला. या घटनेने खानापूर (ता.भोर) परिसरात हळहळ झाली. रघुनाथ भालेराव हा चिमुकला घराशेजारील अंगणात मोठ्या बहिणी बरोबर खेळत होता. यावेळी अचानक गवतात असणार्‍या सापाने त्यास दंश केला. रघुनाथ हा लहान असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे समजले नाही.

रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्याने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पावसाचे दिवस आहेत. लहान मुलांना सर्प म्हणजे काय कळत नाही. खेळताना सर्पदंश झाला तर अनर्थ घडू शकते. त्यामुळे चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कर्‍हाळे यांनी सांगितले.

हेही वाचा

कोल्हापूर : विद्युत क्षेत्रातील सुधारणा कागदावरच

चीनमध्ये मानवाच्या वेगळ्या प्रजातीचा शोध?

सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास धोका; पुतळ्याखालील बुकिंग रूमचा स्लॅब पाझरतोय

Back to top button