सोलापूर: भोगाव येथे स्मार्ट सिटीच्या केबलला भीषण आग | पुढारी

सोलापूर: भोगाव येथे स्मार्ट सिटीच्या केबलला भीषण आग

गुळवंची: पुढारी वृत्तसेवा : भोगाव कचरा डेपोलगत ठेवलेल्या केबल वायरला अचानक आज (दि.४) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. दूरवर धुराचे लोट पसरले आहेत. महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. सुकलेल्या पाला पाचोळ्याला तीव्र उन्हामुळे आग लागली असावी व त्या शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या केबलपर्यंत ही आग पोहोचली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या आगीत लाखो रुपयांची केबल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील स्मार्ट सिटीच्या कामासाठी केबलचा साठा भोगाव कचरा डेपो येथे ठेवला होता. आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक धूर आणि आगीचे लोट येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. बघता बघता केबलला आग लागून या आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मागील आठवड्यात झोन क्रमांक ०६ सोलापूर येथे ठेवलेल्या वायर पाईप ला देखील अशीच आग लागली होती. सोलापूर महानगरपालिका कचरा डेपो सुद्धा आगीने वेढला होता. सोलापूर मध्ये या आठवड्यातील आगीची ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा 

Back to top button