पुणे: मदनदास देवी म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारू : मोहन भागवत | पुढारी

पुणे: मदनदास देवी म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारू : मोहन भागवत

आशिष देशमुख

पुणे, पुढारी ऑनलाईन: हजारो लोकांना वात्सल्य आणि प्रेमाने बांधून ठेवण्याची हातोटी असलेले मदनदास देवी म्हणजे अखंड स्थितीचा निर्धारु असेच त्यांचे वर्णन करता येईल. चार्टड अकाऊंटंट असून त्यांनी आपले संपुर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघालासाठी दिले, अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोहनदास देवी यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बंगरुळू येथे निधन झाले. त्याचे पार्थिव विमानाने पुणे येथील संघाच्या मोतीबाग कार्यालयात मंगळवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत मोहन भागवत बोलत होते. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, केंदीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप व संघाचे देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भागवत पुढे म्हणाले की, मदनदास देवी याची बुद्धीमता वाखाणण्याजोगी होती. सीए असूनही त्यांनी संघकार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांना ज्यांचा सहवास लाभला ते भाग्यवान आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रेमापोटी इतके लोक देशभरातून इथे आले आहेत. त्यांचे जीवन म्हणजे “बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू”असेच होते.

हेही वाचा:

वाडा : ‘जलजीवन’चे निकृष्ट काम वाहनचालकांच्या मुळावर?

पुरंदरच्या पश्चिम भागातील वाटाणा पीक जोमात

आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या

 

Back to top button