पुणे: सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्वीकारला पीएमपी अध्यक्ष पदाचा पदभार… | पुढारी

पुणे: सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्वीकारला पीएमपी अध्यक्ष पदाचा पदभार...

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या अध्यक्ष पदाचा पदभार गुरुवारी सायंकाळी सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्वीकारला. पीमपी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

पीएमपी अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण खात्यात गुरुवारी बदली झाली. त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती शासनाने केली. सिंग यांनी गुरुवारीच पीएमपी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार व अन्य पीएमपीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सिंग यांनी यापूर्वी पशुसंवर्धन खात्यात काम पाहिले आहे. गेली काही महिने ते बदली मिळण्याच्या प्रतीक्षेत होते, अखेर गुरुवारी त्यांची पीमपीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.

हेही वाचा:

पुणे: बलात्कार, अ‍ॅट्रासिटी प्रकरणातील दोघे पोलिस निलंबीत

पुणे-बंगळूर महामार्गावर विजापूर-सातारा एसटीचा अपघात; चालक वाहकासह १२ प्रवाशी जखमी | Satara Accident

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरातील विद्यार्थ्यांचा जीव ‘राम भरोसे’

 

Back to top button