बारामतीचा जिरायती भाग दुष्काळाच्या छायेत | पुढारी

बारामतीचा जिरायती भाग दुष्काळाच्या छायेत

उंडवडी सुपे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महत्त्वाचे म्हणजे बारामतीचा जिरायती भाग पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत आहे. या भागातील शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे. बारामती तालुक्यासह जिरायती भागातील शेतकरी पाऊस पडेल या आशेवर बसला आहे. परंतु दिवसेंदिवस दिवस पाऊस लांबत चालल्याने शेतीसह सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम जाणवत आहे.

सध्या विहिरी, नाले कोरडेठाक पडल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. जिरायती भागातील शेतकरी जानाई-शिरसाई कालव्यावर अवलंबून असून, उंडवडी, सुपे परिसरात पाण्याची परिस्थिती बिकट असून, यंदा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरसाई कालव्याला आवर्तन सोडावे, अशी मागणी येथील शेतकरी गणेश भगत यांनी केली आहे.

शिरसाई कालव्याला खडकवासला धरणातून आवर्तन येते. परंतु सध्या धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने कालव्याला आवर्तन सुटणे अवघड आहे. खडकवासला धरण 80 टक्के भरल्यानंतर आवर्तन सुटेल. जर पाऊस जास्तच लांबला तर केवळ पिण्यासाठी पाणी सुटू शकते.

-अमोल शिंदे, पाटबंधारे विभाग

हेही वाचा

मंचर : दुचाकीवरून जाणार्‍या बाप-लेकावर बिबट्याचा हल्ला

शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांना पन्नास-पन्नास टक्के पाठिंबा!

पडसाद भूकंपाचे : कर्मभूमीतच शरद पवारांकडे उरला नाही शिलेदार

Back to top button