पुणे : मासळीचे तेजीतील दर टिकून | पुढारी

पुणे : मासळीचे तेजीतील दर टिकून

पुणे : देशाची पूर्व किनारपट्टी असलेल्या हावडा, ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या भागातून तुरळक स्वरूपात मासळी बाजारात दाखल होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने मासळीचे तेजीतील दर टिकून आहेत. बाजारात चिकन, मटण व इंग्लिश अंडी वगळता सर्वांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. मागणी वाढल्याने इंग्लिश अंडी शेकड्यामागे पंधरा रुपयांनी वधारल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 4) खोल समुद्रातील मासळीची 2 ते 3 टन, नदीच्या मासळीची एक टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1800-2200, मोठे : 1600-1700, मध्यम : 1400-1500, लहान : 1000-1200, भिला : 700-800, हलवा : 1000-1200, सुरमई : 1000-1200, रावस : 900-1000, घोळ : 800-900, करली : 400-480, करंदी (सोललेली) : 400-480, वाम : काळी 400-480, पिवळी 800-900, ओले बोंबील : 320-360. कोळंबी : लहान 360-400, मोठी : 450-550, जंबोप्रॉन्स : 1400-1500, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1500-1600, मोरी : 320-360, मांदेली : 160, राणीमासा : 250-280, खेकडे : 320-360, चिंबोर्‍या : 550-600. बांगडा : लहान 160-180 मोठा 240-280, खुबे : 120-140, तारली : 160-200. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 200, खवली : 200, आम्ळी : 120-160, खेकडे : 400-480, वाम : 500-550.
मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 240, लेगपीस : 290, जिवंत कोंबडी : 180, बोनलेस : 330. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 570, डझन 78, प्रतिनग 6.50.

 

Back to top button