चाकण : कांदा, लसणाच्या भावात वाढ | पुढारी

चाकण : कांदा, लसणाच्या भावात वाढ

चाकण (पुणे ) : महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये गुजरातहून डांगर भोपळ्यासह परवल व हिरव्या मिरचीची मोठी आवक झाली. कांदा व लसणाची आवक घटून भावात वाढ झाली. सातार्‍याहून आले, मुरबाडहून भेंडी व तोतापुरी कलमी आंबा आणि परवलची आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्सी गाई, बैल, म्हैस व शेळ्या, मेंढ्या यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड बाजारात मोठी उलाढाल झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 10 लाख रुपये झाली. कांद्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 500 क्विंटलने घटून कांद्याचा कमाल भाव 1300 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 1800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 10 क्विंटलने वाढून कमाल भाव 8 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 300 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 160 क्विंटलने वाढून भावात मोठी वाढ झाली. 5 हजार रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 1500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1300 रुपये, भाव क्रमांक 2. 1000 रुपये, भाव क्रमांक 3. 700 रुपये.

फळभाज्यांची एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती 10 किलोला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे :
टोमॅटो – 280 क्विंटल (2000 ते 3000 रुपये), कोबी – 215 क्विंटल (500 ते 800), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900), वांगी – 83 क्विंटल (1000 ते 2000), भेंडी – 135 क्विंटल (2000 ते 4000), दोडका – 63 क्विंटल (3000 ते 4000), कारली – 69 क्विंटल (2000 ते 3000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1000 ते 2000), काकडी – 74 क्विंटल (2000 ते 3000), फरशी – 69 क्विंटल (2000 ते 3000), वालवड – 63 क्विंटल (1500 ते 2500), गवार – 14 क्विंटल (7000 ते 9000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2000 ते 3000), चवळी – 24 क्विंटल (2000 ते 3000), वाटाणा – 55 क्विंटल (5000 ते 7000), शेवगा – 30 क्विंटल (2000 ते 3000), गाजर – 130 क्विंटल (2000 ते 3000).
पालेभाज्या : एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण 16 हजार 650 जुड्या (1,500 ते 1,800 रुपये,), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (500 ते 1,500 रुपये), शेपू – एकूण 3 हजार, 550 जुड्या (800 ते 1,200 रुपये), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या (400 ते 600 रुपये).

जनावरे (कंसात किमान व कमाल भाव) : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50 जर्शी गाईंपैकी 30 गाईंची विक्री झाली. (15000 ते 70000 रुपये), 105 बैलांपैकी 80 बैलांची विक्री झाली (15000 ते 50000 रुपये ), 210 म्हशींपैकी 160 म्हशींची विक्री झाली. (30000 ते 80000 रुपये). 8100 शेळ्या-मेंढ्यांपैकी 7200 शेळ्यांची विक्री (2000 ते 25000 रुपये). गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 1910 बोकडांपैकी 1460 बोकडांची विक्री झाली. बोकडाला 10 हजार रुपयांपासून 35 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

हे ही वाचा : 

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारीत ; स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची घोषणा

पुणे : हिरवी मिरची, गाजर, मटार महागला

Back to top button