पुणे : हिरवी मिरची, गाजर, मटार महागला | पुढारी

पुणे : हिरवी मिरची, गाजर, मटार महागला

शंकर कवडे : 

पुणे : उन्हाच्या चटक्याने निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा, त्यात पावसाने ओढ दिल्याने टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, गाजर व मटारच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात या फळभाज्यांच्या आवेकत घट झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे दर टिकून
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. गतआठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 25 हजार जुडींनी वाढली. तर, बहुतांश पालेभाज्यांची आवक स्थिर राहिली. बाजारातील आवक- जावक कायम राहिल्याने पालेभाज्यांचे दर टिकून राहिले.

 

 

Back to top button