पिंपरी: भोसरीत कावळ्याच्या पिलांना जीवदान | पुढारी

पिंपरी: भोसरीत कावळ्याच्या पिलांना जीवदान

भोसरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भोसरी परिसरात जोरदार पाऊस व वादळी वार्‍याने परिसरातील दोन मोठी झाडे उन्मळून पडली. रस्त्यावरच झाडे पडल्याने काही काळ आळंदी रोडवर वाहतूक ठप्प झाली होती. उन्मळून पडलेली झाडे आपत्ती व्यवस्थापन संघाच्या सदस्यांनी रस्त्यावरून बाजूला केली; तसेच झाडावरील घरट्यातील कावळ्याचा चार पिलांना सदस्यांनी जीवदान दिले.

भोसरीतील आळंदी रोड रास्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणत वर्दळ असते. भोसरी परिसर गेल्या काही दिवसांपासून पाऊस झोडपून काढत आहे. वार्‍यासह पडणार्‍या पावसाने आळंदी रस्त्यावरील दोन झाडे उन्मळून पडली. परिसरातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्रच्या सदस्यांनी याबद्दल माहिती दिली. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती. संघातील सदस्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांना तातडीने हटवून वाहतूक सुरळीत केली. उन्मळून पडलेल्या झाडांबरोबर कावळ्याचा चार पिलांना जीवदान देण्यात आले.

शेजारी असलेल्या झाडावरील फांदीवर घरट्यासहित चार पिल्ले ठेवण्यात आली. दुसर्‍या दिवशी ठेवलेल्या चार पिल्ले सुरक्षित असल्याची माहिती सदस्य संतोष शेलार यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र चे सदस्य करिम सय्यद, दत्ता जैद, संदीप गव्हाणे, दिलीप गायकवाड, प्रल्हाद जाधव यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा:

पुणे: देहू नगरपंचायतीचा अतिक्रमणांवर हातोडा

पुणे: ‘उघड्यावर कचरा फेकल्यास कारवाई’

पुणे: संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या स्थळाकडे दुर्लक्ष

 

Back to top button