पुणे : गदिमांचे स्मारक वर्षात पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : गदिमांचे स्मारक वर्षात पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गीतरामायणामुळे समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून, त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. माडगुळकर कुटुंबीयांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेने स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

पुणे महापालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणार्‍या ग. दि. माडगुळकर स्मारक कामाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगुळकर, प्राजक्ता माडगुळकर आदी उपस्थित होते. आमदार तापकीर म्हणाले, गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद आहे.तर स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

Back to top button