ट्रॅक्टर पलटी झाल्याने युवक ठार; बारामती तालुक्यातील घटना | पुढारी

ट्रॅक्टर पलटी झाल्याने युवक ठार; बारामती तालुक्यातील घटना

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर चालवत असताना तो पलटी झाल्याने त्याखाली येवून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे घडली. आकाश सुभाष बोरकर (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात अक्षय सुभाष बोरकर यांनी फिर्याद दिली.

बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोरकरवडी गावच्या हद्दीत जमिन गट क्रमांक २८९ मध्ये आकाश हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच ४२ बीजे ०६९७) चालवत बांधावरुन नेत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून तो पलटी झाला. त्यात आकाश याचा मृत्यू झाला.

Back to top button