पिंपरी : भोजपुरी अभिनेत्रींना पाठवून चालवले जात होते सेक्स रॅकेट | पुढारी

पिंपरी : भोजपुरी अभिनेत्रींना पाठवून चालवले जात होते सेक्स रॅकेट

पिंपरी : वाकड येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा भोजपुरी अभिनेत्रींना पाठवून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिस तपासात उघड़ झाले आहे. या प्रकरणात दोन तरुणींची सुटका केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (दि.11) ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रबीर प्रकाश मुजुमदार (24, रा. भारती विद्यापीठ, मूळ पश्चिम बंगाल) याला अटक केली असून, वाकड पोलिसांत त्याचे साथीदार दिनेश यादव व विराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुनील शिरसाठ यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एका तारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक बनून दलालास फोन केला. हॉटेलमध्ये रुमबुक करून पीडित मुली आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे दलालालाही अटक केली. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 29 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीडित मुलींमधील एक तरुणी ही भोजपुरी अभिनेत्री तर दुसरी तरुणी मॉडेलिंग करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी ही
कारवाई केली.

Back to top button