पिंपरी : अक्षय तृतीयेनिमित्त फुलांना मोठी मागणी | पुढारी

पिंपरी : अक्षय तृतीयेनिमित्त फुलांना मोठी मागणी

पिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतियेला शहरातील फुल बाजारात तीन टनांपर्यत फुलांची आवक झाली होती. या आठवड्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीस ते पंचवीस टक्के फुलांची नासाडी झाली. अवकाळीमुळे बिजली आणि शेवंतीच्या फुलांना फटका बसला होता. मात्र झेंडूच्या फुलांना अधिक मागणी होती.

बाजारात झेंडु, बिजली, अ‍ॅस्टर, शेवंती, गुलाब, गुलाब पाकळी, गुलछडी व निशीगंधा आदी मिळून तीन टनांची आवक झाली. यापुर्वी साडेचार ते पाच टनांची आवक होत होती. मात्र उन्हाचा जोर वाढल्याने फुलांचे उत्पादन घटले तसेच पावसामुळे फुलांची नासाडी झाली होती. शेवती आणि बिजलीची फुलांना पावसाचा मोठा फ टका बसल्याने त्यांची आवक कमी झाली होती. परिणामी बाजारात ही फु ले लवकरच संपली होती.

Back to top button