पुणे : पीक कर्ज व्याज सवलतीचे 57 कोटी लवकरच जमा होणार | पुढारी

पुणे : पीक कर्ज व्याज सवलतीचे 57 कोटी लवकरच जमा होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड केल्यास देण्यात येणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून आर्थिक वर्ष 2021-22 व तत्पूर्वीच्या वर्षातील रक्कम प्राप्त झालेली आहे. पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर व्याज सवलत योजनेपोटी प्राप्त 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये येत्या आठवड्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा होतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली.

योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2 हजार 917 शेतकर्‍यांना मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 60 हजार 254 शेतकर्‍यांना 12 कोटी 91 लाख 69 हजार 939 रुपये आणि राज्य सरकारकडून प्राप्त निधीतून 2 लाख 28 हजार 663 शेतकर्‍यांना 44 कोटी 40 लाख 7 हजार 86 रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम प्राप्त झाली आहे.

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 3 टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकांतून पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी ही योजना राबविण्यात येते.

  • जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार शेतकर्‍यांना होणार लाभ
  • जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप यांची माहिती

Back to top button